Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मातोश्री शेत पाणंद रस्त्यांची कामे त्वरीत पुर्ण करा- आ. किशोर पाटील

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित रस्ते काम सुरू करण्याचे निर्देश आ. किशोर पाटील यांनी दिले.

 

आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आ. पाटील यांनी दिलेल्या सुचनेमुळे आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे चित्र निर्माण झोले आहे.

 

पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ते अंतर्गत सुमारे ९१ रस्ते मंजूर झाले आहे. यात पाचोरा तालुक्यात ५७ तर भडगाव तालुक्यातील सुमारे ३४ रस्त्यांचा समावेश आहे. लवकरच आणखी काही रस्त्यांना मंजुरी मिळणार असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी बैठकीत ठरवण्यात आले. या योजनेंतर्गत प्रत्येकी १ किलो मीटर रस्ता केला जाणार असून यासाठी सुमारे २४ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

 

बैठकीला पाचोरा तहसिलदार कैलास चावडे (पाचोरा), तहसिलदार मुकेश हिवाळे (भडगाव), पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, भडगाव गटविकास अधिकारी वाघ, बांधकाम विभागाचे मुख्य सहाय्यक अभियंता दिपक पाटील, शेलार, काजवे, तसेच पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंते, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version