Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मातोश्री फाऊंडेशनच्या मालमत्ता चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

FIR

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पिंपरूड येथील मातोश्री फाऊंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची मालमत्ता नासधूस करून चोरी झाल्याप्रकरणी अखेर फैजपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मार्च 19 मध्ये मातोश्री फाउंडेशन पिंपरुळ फाटा येथील मातोश्री फाऊंडेशनचे तार कंपाउंड असलेले एक लोखंडी मेन गेट, 70 पन्हाळी पत्रे 35 लोखंडी चौकोनी पाईप दोन सागाचे दिवान 4 गाड्या व उषा 10 चा गडी, 10 रजई, पंधरा बाय पंधरा रुंदीची 1 सतरंजी, 6 पंघट चटाई, एक लाकडी सागवानी टेबल, एक संगणक टेबल, स्वयंपाकाची स्टीलची भांडी, 10 एलईडी लाईट एक लोखंडी रॅक एक लाकडी स्टूल, 10 प्लास्टिकच्या खुर्च्या, 2 लाकडी दरवाजे, 3 सिलिंग फॅन असे एकुण 64 हजार रुपये किमतीचे साहित्य हे 28 मार्च ते 2 जुन 2019 या काळात टप्प्याटप्प्याने वेळोवेळी संशयित आरोपी सरपंच नंदकिशोर चौधरी व योगराज चंद्रहास्य चौधरी जळगाव व त्यांच्या सोबतचे इतर साथीदार त्यांनी संगनमताने परस्पर चोरून नेले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मातोश्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी दिलेल्या तक्रारी नुसार फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ.हेमंत सांगळे व त्यांचे सहकारी करीत आहे.

Exit mobile version