फुले मार्केट परिसरात अतिक्रमण निर्मुलन कारवाईत २२ हॉकर्सधारकांचे साहित्य जप्त (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन उघडल्यानंतर शहरातील बाजारपेठे नागरीकांची गर्दी वाढली आहे. त्यात रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील २२ हॉकर्स धारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली तर बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई आज केली. 

शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट, दाणाबाजार, सराफ बाजार, सुभाष चौक, बोहरा गल्ली ते बेंडाळे चौकात अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केली. यात नागरीकांची गर्दी वाढल्याने वाहनांची देखील गर्दी होत आहे. या गर्दीमुळे अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्स धारकांसह वाहनांमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने दुपारी १२ वाजता अतिक्रमण निर्मुलन कारवाई राबविण्यात आले. यात २२ हॉकर्सधारकांवर कारवाई केली असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सोबत रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. 

Protected Content