Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित” अभियानास सुरवात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील विविध भागात “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित” या अभियानास पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व डॉ. अर्चना पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे.

पहिल्याच दिवशी शाहूनगरात ११५ गरोदर माता व १८ वर्षांवरील युवक, युवतींची आरोग्य तपासणी करण्यात आली. संपूर्ण शहरात आरोग्य सेविका भारती पाटील, मनिषा गढरी, आकाश ठाकूर, शेख सलमान, लॅब असिस्टंट शेख साहिल, आशा वर्कर प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, वैशाली पाटील, मनिषा अहिरे, वैशाली महाजन, हिना पाटील ह्या किशोर वयातील मुले, मुली, गरोदर माता यांचे वजन, उंची, रक्तगट, हिमोग्लोबिन, सह आरोग्य तपासणी करुन त्यांना कॅल्शियम युक्त गोळ्यांचे वाटप करीत आहेत. ही योजना दि. ५ आॅक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार असुन योजनेस तमाम माता भगिनी, युवक व युवतींनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी केले आहे.

Exit mobile version