Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत भीषण आग, दोघांचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळल्यावर अग्निशमनदलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय, ६०) आणि नलिनी शाह (८२) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करुन काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गिरगाव चौपाटीमध्ये काल आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांची घर जळालेले आहे त्यांना पाच लाखांची मदत तत्काळ जाहीर केलेली आहे.

Exit mobile version