Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुदानमधील भीषण स्फोटात १८ भारतीय मृत्युमुखी

sudan blast

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ भारतीय आहेत. या स्फोटामध्ये १३० जण जखमी झाले आहेत. सुदानमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे.

 

मंगळवारी सुदानच्या बाहरी भागात असणाऱ्या सीला सिरॅमिक कारखान्यातील स्फोटानंतर १६ भारतीय बेपत्ता झाले होते. एकूण १८ जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय दूतावासाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

बेपत्ता असलेले काही जण मृतांच्या यादीमध्ये असू शकतात. मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटणे कठीण झाले आहे. या स्फोटानंतर दूतावासाने बेपत्ता झालेले, रुग्णालयात दाखल असलेले तसेच बचावलेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार सात जण रुग्णालयात असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

बचावलेल्या ३४ भारतीयांची सलुमी सिरॅमिक फॅक्टरीच्या कारखान्यात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी सुरक्षेची आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्याची माहितीही समोर आली आहे.

Exit mobile version