Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सोमवारी सामूहिक कॅमेरा पूजन

camera

भुसावळ, प्रतिनिधी | जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त येथील फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने सामूहिक कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे उद्या (दि.१९) आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार संजय सावकारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह जेष्ठ छायाचित्रकारांची उपस्थिती लाभणार आहे.

 

भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर येथे पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी संपूर्ण तालुक्यातील छायाचित्रकार आपापल्या परीने यावेळी मदतनिधी जमा करणार आहेत. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे यांनी कळवले आहे .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे, उपाध्यक्ष बबलू ब-हाटे, सचिव राहुल पाटील, सहसचिव राजीव भंगाळे, कोषाध्यक्ष अजय शिंपी, कमिटी मेंबर निलेश कोलटकर, अतुल शिंदे, अविनाश तडस, महेंद्र बार्हे, विनोद गोर्दे, कमलेश चौधरी, सचिन काकडे, सर्व असोसिएशनचे सदस्य परिश्रम घेत आहेत. सामूहिक कॅमेरा पूजन कार्यक्रम सकाळी ९.०० वाजता विश्वकर्मा मंदिर म्युनिसिपल पार्क येथे आयोजित केलेला आहे. तरी कृपया सर्वांनी आपला कॅमेरा घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.०० वाजता सर्व छायाचित्रकार बांधवांचा स्टार रिसॉर्ट सिनेमा येथे फॅमिली गेट-टुगेदर व मनोरंजन कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले नाव सचिव राहुल पाटील यांच्याकडे १९ रोजीच नोंदवायचे आहे.

Exit mobile version