Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे महाविद्यालयात शहीद दिन उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.  प्रा. साळवे यांनी शहीद  भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मं पत्करले. ” मै जला हुआ राख नहीं ..बल्कि अमरदीप हूँ ” हा संदेश  या वीर हुतात्मांनी हिंदूस्थानासाठी दिला. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी शहीदांचे बलिदान अखंडित स्मरणात ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी ” शहीदों का बलिदान हम बदनाम नही होने देंगे….और भारत की आजादी की कभी शाम नही होने देंगे..!”  अशी प्रतिज्ञा विदयार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांना शहीदांच्या बलिदानाविषयी आणि देशाच्या स्वातंत्र्याविषयी राष्ट्रप्रेमाची  संदेश दिला.

कार्यक्रमाप्रसंगी प्रफुल यमनेरे या विद्यार्थ्यांनी शहीद दिनानिमित्त “इन्कलाब जिंदाबाद..!”  हा नारा देऊन  शहिदा दिनानिमित्त कविता रुपात मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन तसेच  महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ.प्रतिभा ढाके यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय डांगे, प्रास्ताविक  प्रा.सरोदे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दिपक बावस्कर यांनी केले. फोटोग्राफीचे कार्य एनएसएस विद्यार्थी उदय कोळी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारीवर्ग बहुसंख्येने महाविद्यालयाच्या पटांगणात उपस्थित होते.

Exit mobile version