Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन वर्षाच्या मुलासह विवाहिता बेपत्ता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहिता ही आपल्या दोन वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाल्याची घटना यावल तालुक्यातील कोळवद गावात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सचिन रविन्द्र अढायगे वय-३१, रा. कोळवद ता. यावल येथे आपल्या आई वडील व कुटुंबासह राहतात. १६ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सचिन अढायगे हे शेतात कामास गेले होते. त्यांची पत्नी मिना सचिन अढायगे (वय-२२) ह्या त्यांचा मुलगा आयुष अढायगे (वय-२) याला सोबत घेवून राहत्या घरातुन कुणास काही एक न सांगता निघुन गेल्या. सचिन अढायगे यांनी आपल्या पत्नीचा व लहान बाळाचा सर्वत्र शोध घेतला परंतू ते मिळुन आले नाही. अखेर सचिन अढायगे यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने हरविल्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर हे तपास करीत आहे.

Exit mobile version