सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून तालुक्यातील तमगव्हाण येथील विवाहितेने घरात दोर बांधून गळफास घेतला होता. याप्रकरणी अत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली उर्फ उज्ज्वला राजेंद्र पाटील (वय-४३) रा. तमगव्हाण ता.चाळीसगाव यांचा विवाह २००४ मध्ये राजेंद्र प्रताप गायकवाड यांच्याशी झाला होता. लग्नानंतर १ वर्ष चांगले गेले त्यानंतर सासरच्या मंडळींकडून मुलगा होत नाही म्हणून मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. हा त्रास त्यांच्या आईवडीलांच्या सांगण्यावरून सहन केला. पती राजेंद्र प्रताप गायकवाड कोणत्याही कारणावरून शिवीगाळ व मारहाण सुरूच ठेवले. दरम्यान अखेर या त्रासाला कंटाळू विवाहिता वैशालीने घरात कुणीही नसतांना दोरीच्या मदतीने राहत्या घरात अत्महत्या केल्याचे शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी उघडकीला आले.

दरम्यान सासरच्या छळाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे असा आरोप मयत मुलीचे वडील योगराज नामदेव देसले रा. पिंपळगाव ता. भडगाव ह.मु.वळुज औरंगाबाद यांनी केला आहे. वडीलांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती राजेंद्र प्रताप गायकवाड, सासरे प्रताप गोपाळ गायकवाड, संगिता नाना काळे, दिनकर प्रताप गायकवाड आणि केशव गोपाळ गायकवाड सर्व रा. तमगव्हाण ता. चाळीसगाव यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहे. 

Protected Content