Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चारीत्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा

mahila

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील माहेर असलेल्या माहेरवाशीनीचा चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे येथील पतीसह सहा जणांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, शहरातील एका भागात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा पुणे येथील तुषार भिकन ठाकरे यांच्याशी २०१९ मध्ये विवाह झाला. लग्नात आईवडीलांना मान-पान दिला नाही तसेच विवाहितेच्या चरित्र्याचा संशयित घेवून पती तुषार ठाकरे यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तुझ्या मुलाला  पळवून घेवून जाईल व जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात सासू शारदा भिकन ठाकरे रा. पुणे, नणंद संजीवनी मोहन सोनवणे, नंदोई मोहन दोधून सोनवणे, नणंद रूपाली मुकेश चित्ते, रा बडोदा गुजरात, ज्योत्सना संदीप वेळीस रा. बडवाणी (मध्यप्रदेश) यांनी देखील शिवीगाळ करून पती तुषार ठाकरे याला पाठींबा दिला. विवाहितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महीला पोहेकॉ शारदा भावसार करीत आहे. 

Exit mobile version