Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामेश्वर कॉलनीत विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या लता गणेश वंजारी यांचा विवाह रामेश्वर कॉलनीतील गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती गणेश लाडवंजारी याने पैश्यांसाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुझ्या वडीलांकडून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. परंतू वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, सासून दिर व दिरानी यांनी शरिरीक व मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गणेश लाडवंजारी, सासरे संजय लाडवंजारी, सासू मनीषा संजय लाडवंजारी, दीर मुकुंदा संजय लाडवंजारी आणि दिरानी राणी मुकुंदा लाडवंजारी सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.

Exit mobile version