दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । दोन लाख रूपये माहेरहून आणावे, यासाठी सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शमिना आसिफ खान (वय-२०) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव ह.मु. सबजेल पाठीमागे याचा विवाह शहरातील आसिफ खान रेहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आशिफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान आईवडीलांची परिस्थीत गरीबीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करून शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आशिफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अशीफ खान, सासरे रेहेमतुल्ला खान, जेठाणी नमिरा मोहसिन खान, दिर बबलू रेहेमतुल्ला खान सर्व रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content