Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।  घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कांचन नगरातील दिलीप किरणा येथील माहेरवाशीन योगिता अजिंक्य बोर्‍हाडे (वय-२१) यांचा पुणे जिल्ह्यातील आडेफाटा येथील अजिंक्य बजरंग बोर्‍हाडे यांच्याशी २५ जानेवारी २०१९ रोजी रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींकडून योगिता हिला घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे यासाठी त्रास देत त्या विवाहितेला शिविगाळ करीत मारहाण केली जात होती. तसेच पैसे आणले नाही म्हणून त्या विवाहितेला उपाशी ठेवून तिच्यावर शारिरीक व मानसिक छळ करीत मारुन टाकण्याच देखी धमकी दिली जात होती. दरम्यान, दररोजचा होणारा त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी आली होती. दरम्यान, गुरुवारी २७ जानेवारी रेाजी दुपारी ३ वाजता विवाहितेने शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पती अजिंक्य बजरंग बोर्‍हाडे, सासरे बजरंग दादाभाऊ बोर्‍हाडे, सासू दिपाबाई बजरंग बोर्‍हाडे, नणंद पुजा सागर लगडे रा. धुळे, आरती अमर मोहीते रा. बारामती यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना भावसार करीत आहे.

Exit mobile version