तीन लाखासाठी विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तुळजामाता परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेला माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पल्लवी किरण शिंदे (वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी तुळजामाता नगर यांचा विवाह १८ एप्रिल २०१९ रोजी किरण हरचंद शिंदे रा. कापुसवाडी ता. जामनेर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचा एक महिन्यानंतर पती किरण शिंदे यांनी ‘स्वयंपाक व शेती काम येत नाही असे’ असे टोमणे विवाहितेला मारणे सुरू केले. त्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे या मागणीसाठी सासु, सासरे, जेठ, जेठाणी यांनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन गांजपाट करण्यास सुरुवात केली. दरम्यान हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता पल्लवी शिंदे या जळगाव येथील माहेरी निघून आल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्यात २४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता धाव घेवून तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती किरण हरचंद शिंदे, सासु नर्मदाबाई हरचंद शिंदे, सासरे हरचंद किसन शिंदे, जेठ प्रकाश हरचंद शिंदे आणि जेठाणी आशाबाई प्रकाश शिंदे सर्व रा. कापूसवाडी ता. जामनेर जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

Protected Content