Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहा लाखासाठी विवाहितेचा छळ; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । व्यवसायासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या ३ जणांविरूद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, गणपतीनगरातील माहेर असलेल्या रेखा मराठे यांचा जळगाव शहरातीलच पार्वतीनगर येथील योगेश ऊर्फ गोविंद अरुण मराठे यांच्याशी विवाह झाला आहे.  लग्नानंतर काही दिवसांनी रेखा यांनी व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यावरुन पतीसह सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. याच कारणावरून रेखा यास वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करत पतीसह सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. छळाला कंटाळून रेखा मराठे यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती योगेश ऊर्फ गोविंद मराठे  , सासू विठाबाई अरूण मराठे  , जेठ डिगंबर अरुण मराठे  तिघे रा. पार्वतीनगर  यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास मपोहेकॉ रत्ना मराठे करीत आहे.

 

 

Exit mobile version