Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात राहणाऱ्या भावना रवि चौधरी (वय-२९) यांचा विवाह पंजाब राज्यातील खमाने येथील रवि प्रमोद चौधरी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर पती रवि चौधरी याने लग्नात काहीह दिलेले नाही असे टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर लग्नात तुझ्या वडीलांना कार घेण्यासाठी पाच लाख रूपये दिले नाही, तसेच लग्नाच्या वेळी घरगुती वापराचे सामान दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर सासू, नणंद आणि नंदाई यांनी पैश्यांचा तगादा लावला होता. वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने आपण पैश्यांची पुर्तता करून शकत नाही असे सांगितल्यावेर पती रवि चौधरी याने विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने माहेरी निघून आल्या. विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार १६ डिसेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात पती रवि प्रमोद चौधरी, सासू अंजली प्रमोद चौधरी, नणंद प्रिती प्रकाश चौधरी, नंदोई प्रकाश रामकिशन चौधरी दोन्ही रा. नवागाम दिंडोली जि. सुरत गुजराथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

 

Exit mobile version