Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ तर भावाला जीवे मारण्याची धमकी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील समर्थ कॉलनी येथील विवाहितेचा दुकानासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी छळ करणार्‍या पतीविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गायत्री भामरे वय (वय-३३) या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. १२ ऑक्टोंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०२१ या काळात गायत्री यांचा पती जितेंद्र अंबादास भामरे वय ३९ रा. दशरथ नगर, जुना खेडी रोड जळगाव यांनी दुकानासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ करत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच गायत्री यांच्या मुलीलाही शिवीगाळ करत, गायत्री यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी जितेंद्र भामरे यांनी दिली. छळाला कंटाळून गायत्री ह्या माहेरी निघून आल्या. अशा गायत्री भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती जितेंद्र अंबादास भामरे यांच्या विरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version