Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

फैजपूर प्रतिनिधी । माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, सोनल रवी चिमणकर (वय-२९) रा. फैजपूर ता. यावल यांचा विवाह मध्यप्रदेशातील रवि जानकर चिमणकर रा. बाणगंगा, भोपाल मध्यप्रदेश यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. २४ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत पती रवी चिमणकर यांने विवाहितेला लहान गोष्टींवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण केली. तर सासून, सासरे, तीन नंदा यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली त्यात तू जर पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही अशी धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता फैजपूर येथील माहेरी निघून आल्या. याप्रकरणी मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी फैजपूर पोलीसात तक्रार दिली. याप्रकरणी फैजूपर पोलीस ठाण्यात पती रवि चिमणकर, सासून इंदूबाई जानकर चिमणकर, सासरे जानकर किसन चिमणकर सर्व रा. भोपाल, नणंद राखी मनोहर खिरोडकर रा. रायपूर छत्तीसगड, लता विजय वानखडे रा. जळगाव, माया संदीप साखरे रा. शेंदुणी जामनेर  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

Exit mobile version