Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर आलेल्या विवाहितेचा सोन्याची चैन व पाच लाख रूपयांसाठी छळ करणाऱ्या भुसावळ येथील पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रियंका सुरेश महाले (वय-२५) रा. भुसावळ ह.मु. नशिराबाद ता.जि.जळगाव याचा ८ नोव्हेबर २०२ रोजी भुसावळ येथील सुरेश दयाराम महाले यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला.  प्रियंका यांच्याशी छोट्या छोट्या कारणावरून टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर पती सुरेश महाले यांनी प्लॉट घेण्यासाठी पाच लाख आणि सोन्याची चैन घेवून ये असे सांगून शिवीगाळ व मारहाण केली. सासरे दयाराम महादेव महाले, सासू सिंधूबाई दयाराम महाले, दीर प्रविण दयाराम महाले सर्व रा. भुसावळ रेल्वे कॉटर्स, नणंद सोनीया घनश्याम सावळे, नंदोई घनश्याम सवळे रा. अहमदनगर यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी विवाहितेला घराबाहेर काढून दिले. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता नशिराबाद माहेरी निघून आल्या. आज शुक्रवार रोजी सकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Exit mobile version