मार्गारेट अल्वा विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

विरोधी पक्षांनी मूळच्या कर्नाटक येथील आणि मागे गोव्याच्या राज्यपाल असलेल्या मार्गारेट अल्वा यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्या दि. १९ रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी याबद्दल माहिती दिली. या बैठकीदरम्यान टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत असून विरोधी उमेदवाराला आतापर्यंत १७ पक्षांचा पाठिंबा आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही विरोधकांसोबत असल्याचे शिवसेनेने सांगितले.

Protected Content