Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठी कलाकारांकडून एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हॅशटॅग

Marathi celebrity tweets

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपने सरकार आपलेच येईल असा दावा केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत. यावर कॉंग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

 

मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहे. कलाकारांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. भाजपकडून पैसे घेऊन ट्विट केले आहेत का असा प्रश्न ट्विटरवर विचारले जात आहेत. तर काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तेची बोलणी सुरु असताना, दुसरीकडे कलाकार असे ट्विट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Exit mobile version