Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा समाजातर्फे आ.चंद्रकांत पाटलांचा भव्य नागरी सत्कार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध मराठा समाज संघटनांतर्फे त्यांचा हृद्य व भव्य असा सत्कार करण्यात आला.

आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.आमदार चंद्रकांत पाटील यांनी अगदी कमी कालावधीत गोरगरीब जनतेच्या हक्काची विकास कामे खेचून आणत तसेच विविध समाजासाठी मोठ मोठे सभागृह मंजूर करून आणले यासह गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे उपेक्षित सभागृह देखील सुमारे २.२० कोटीच्या भरीव निधी सह मंजूर करून आणले. समाजाला तालुका ठिकाणी हक्काचे दालन उपलब्ध होत असल्याने तसेच एमआयडीसी सारखे मोठे प्रकल्प जे सर्व सामान्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करतील असे ऐतिहासिक प्रोजेक्ट मतदार संघाच्या पदरात पाडून घेतले.

त्यामुळे सर्व सामान्यांचे गळ्यातील ताईत झालेले तसेच मराठा समाजाचे मानबिंदू ठरलेले मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून मराठा समाजातर्फे पाटील यांचा मुक्ताईनगर येथील शिवरायनगर प्रभाग क्र .१२ मध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे आमदारांच्या सत्कारासाठी मराठा समाजातील विविध १३ संघटना एकाच मंचांवर आलेल्या दिसून आल्या असून मराठा समाज बांधवांची देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दिसून आली.

या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रभाग क्र. १२ शिवरायनगर येथील किर्तनकार दुर्गाताई मराठे यांच्या आदिशक्ती मुक्ताई महिला मंडळाने टाळ , मृदुंग मुक्ताई नाम गजरात दिंडी सोहळ्याने केले आमदारांचे आगळे वेगळे स्वागत, याप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे चोपदार , भागवतकार ,कीर्तनकार हरी भक्त परायण पंकज महाराज पाटील यांचे हस्ते आमदारांना वारकरी संप्रदायाची मानाची पगडी(फेटा) घालून प्रभागाच्या प्रवेश द्वारावर त्यांचे स्वागत करून दिंडी सोहळा तसेच मार्गावर पुष्पवृष्टी करून त्यांचे सत्कार स्थळापर्यंत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

मुक्ताईनगर तालुका मराठा समाज आयोजित कार्यक्रमात :
१)मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाज,
२)मराठा सेवा संघ मुक्ताईनगर,
३)मराठा सेवा संघ बोदवड,
४)मराठा समाज सेवा मंडळ कुर्‍हे विभागातील कार्यकर्ते,
५)राजे लखुजीराव जाधव समाज विकास बहुद्देशीय संस्थेचे संचालक मंडळ,
६) राष्ट्रीय छावा संघटना अखिल भारतीय कुणबी महासंघ,
७)तसेच या सत्कार सोहळ्यात सहभाग मुक्ताईनगर, जामनेर, बुर्‍हानपूर, मलकापूर, चाळीसगाव, जळगाव, रावेर, बोदवड,भुसावळ, वरणगाव, कुर्‍हा काकोडा अंतुर्ली या परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

दरम्यान, यासोबत, संतोष मराठे यांचे नगरसेवक पदाच्या कार्यकाळातील प्रभाग क्र.१२ मधील विविध विकास कामांचे कार्य पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा देखील यावेळी मोठ्या उत्साहात पार पडला.

याच सत्कार सोहळ्यात मराठा समाजातील विविध संघटने कडून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यामध्ये आनंदराव देशमुख (तालुकाध्यक्ष सकल मराठा समाज मुक्ताईनगर); सुनिल महाजन (मराठा वस्तीग्रुह कक्ष बर्‍हाणपुर); दिनेश कदम (जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशी संस्था तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर); प्रविण कान्हे, (प्रदेश सरचिटणीस अखिल भारतीय कुणबी महासंघ); मराठा महासंघ मुक्ताईनगर अध्यक्ष बाळासाहेब पाटील; भुसावळचे रविंद्र ढगे, हितेश टकले; सकल मराठा समाज कुर्‍हा काकोडा विभाग अध्यक्ष नवनीत पाटील; मराठा सेवा संघ मुक्ताईनगर अध्यक्ष रमेश तुळशीराम पाटील; मराठा सेवा संघ बोदवडचे अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रीय-छावा संघटनेचे रविंद्र जाधव , सचिन मालवणकर यांचेसह उपस्थित सर्वच संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पाटील, संदीप बागुल, योगेश पाटील, विनोद पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील,ललीत बाविस्कर, विश्वनाथ पाटील, विजय मराठे, दिलीप कदम, सिताराम चवरे, दिलीप पाटिल, हितेश पाटील,किशोर पाटील नरेंद्र गावंडे, रवी चव्हाण ,उल्हास पाटील, सतीश नागरे ,सुनील पाटील निलेश पाटील, गणेश पाटील , ज्ञानेश्वर पाटील, बोरखेडा, बाळू पाटील हिवरा,गोकुळ पाटील, प्रल्हाद पाटील, सचिव पाटील,अमोल पाटिल, गजानन अहिरे,बाळमुकुंद पाटील, विनोद तोरे, संभाजी पाटील,अमोल व्यवहारे, अमोल पाटिल, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील चंद्रकांत सोनवणे भागवत दाभाडे,प्रशात शेळके, गणेश पाटील,मोहन पाटील, संतोष पाटील राजु बंगाळे , दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, सोपान मराठे, जितेंद्र (गोलु) मुर्‍हे, संभाजी वाघ,शैलेश पाटील, पंढरीनाथ पाटील,विष्णू पाटील, राजेंद्र कापसे, गौरव प्रताप लवांडे, सौरभ पाटील, शुभम पाटील, संदीप शिंदे, भैय्या पाटील,जयेश दिलीप पाटील, मितेश पाटील,गजानन ढोन ,पप्पू पाटील, पप्पू मराठे, दामू गवळी, निलेश पाटिल मोहन पाटिल आदी समितीतील समाज बांधवांनी मेहनत घेतली.

Exit mobile version