Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानराज मोटर्स शो रूम फोडले; चार लाखाची रोकड लंपास

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी हद्दीतील मानराज मोटर्स शो रूम फोडून काऊंटरमधून चार लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरी करतांना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी हद्दीतील मानराज मोटार्स शो रूमचे कॅशियर भरत किसन वाघ यांनी सोमवारी सायंकाळी 8.30 वाजेला 3 लाख 99 हजार 385 रूपये रक्कम कॅशियर रूम मध्ये असलेल्या काऊंटर मध्ये नेहमीप्रमाणे ठेवले. अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2.10 वाजेच्या सुमारास टॉमीच्या सहाय्याने शोरूमध्ये काचेचा दरवाजा उघडून आत आले. टॉमीच्या मदतीने काऊंटर फोडून त्यातील 3 लाख 99 हजार 385 रूपये रक्कम काढून एका कॅरीबॅगमध्ये टाकून पसार झाले. हा प्रकार शोरूमच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर दिनेश भगीरथ पाटील वय -42 रा. सुप्रिम कॉलनी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version