Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंक्की हिलजवळ दरड कोसळल्याने रेल्वेसेवा बंद

mankki

लोणावळा वृत्तसंस्था । मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंक्की हिल येथे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याची घटना रेल्वे किमी 115 जवळ घडली आहे. यामुळे मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, लोणावळा व खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोराचा पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी 2च्या सुमारास मंक्की हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती व दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली असल्यामुळे काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.

Exit mobile version