चार विद्यार्थ्यांना इकरा शाळेतून काढल्याप्रकरणी मनियार बिरादरीचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा संस्थेच्या दोन शाळांमधील एकुण चार विद्यार्थ्यांना खासगी द्वेषातून शाळेतून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोघी मुख्याध्यापकांसह व संस्थाचालकांची कायदेशीर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मानियार बिरादरीच्या वतीने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शेख नुरुद्दीन अब्दुल गफ्फार हे हाजी एन.एम. सैय्यद उर्दू हायस्कूल कासोदा या शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवारत आहेत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जळगाव येथे त्यांचे प्रवेश स्थानिक शाळेत घेतले होते. एक मुलगी नामे आयशा सिद्दीका शेख नुरुद्दीन ही बी. एम. जैन उर्दू प्रायमरी स्कूल प्रतापनगर, जळगाव येथे इयत्ता ४ थीत तर दुसरी मुलगी रिमशा फातेमा शेख नुरुद्दीन ही इयत्ता ९ वी त इकरा उर्दू हायस्कूल सालारनगर जळगाव येथे शिक्षण घेत आहे.

भावाचा मुलगा नाम मोहम्मद फैजान मोहम्मद सादिक हा इयत्ता पाचवीत तर मोहम्मद सुफियान मोहम्मद सादिक हा इ. ८ वीत. शिकत आहे. या शाळांचे मुख्याध्यापक शेख आबिद व डॉ. शेख हारुन बशीर यांनी खाजगी द्वेषापोटी त्यांच्या स्कूल लिव्हींग सर्टिफिकेट रजि.पोष्टाने सरळ घरात पाठवून दिले आहे. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांच्याकडे शेख नूरुद्दीन व शेख सादिक यांनी रीतसर तक्रार केली. त्यावर शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांना पत्र पाठवून चारही विद्यार्थ्यांचा रद्द केलेला प्रवेश पुन्हा देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या; परंतू आज शाळेच्या पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांना शाळेत येवू दिले नाही. याबाबत नियामांची पायमल्ली करणाऱ्या दोघी मुख्याध्यापकांसह व संस्थाचालकांची कायदेशीर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मानियार बिरादरीच्या वतीने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना दिले आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व बिरादरीचे फारूख शेख हरीश सय्यद, एडवोकेट आमिर शेख, अख्तर शेख, अल्ताफ शेख पालकांच्य वतीने सत्तार शेख, सैय्यद नुरुद्दीन शेख, सैय्यद सादिक शेख आदींची उपस्थिती होती.

Protected Content