Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन तलाक व डीजे बंदीसह मनियार बिरादरीतर्फे १७ ठराव संमत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनियार बिरादरीच्या आज झालेल्या वार्षिक बैठकीत तीन तलाक व डीजे बंदीसह १७ महत्वाच्या ठरावांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.

जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून त्या एकूण १७ ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. त्यात विशेष करून २५ डिसेंबरला सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठरविण्यात आले. यासोबत साखरपुडा मोठ्या प्रमाणात करणार नाही, साखरपुड्यात भावी नवरदेव ला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधू वर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडा वर शादी हॉल निर्माण करावा, प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात करावी, शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयरोजगारासाठी बिरादरी तर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी असे एकूण १७ ठराव सर्व संमतीने पारित करण्यात आले. याप्रसंगी १५ तालुक्याचे तालुक्याचे पदाधिकारी सह सभासद यांची होती उपस्थिती होती

या बैठकीला अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सय्यद चांद, डॉक्टर फारूक साबीर शेख, रउफ रहीम, ताहेर इब्राहिम, अडव्होकेट आमीर शेख, (सर्व जळगाव) गफुर करीम (एरंडोल) हकीम चौधरी,(मुक्ताई नगर) रफिक बिस्मिल्ला, (४० गाव) इकबाल तकी( धरणगाव) रफिक नादर (बोदवड) इब्राहिम बिस्मिल्ला ( शिरसोली) दगडू वजीर (भडगांव) हाफिझ शेख (यावल) कलीम हैदर ( फैजपूर) अजिज अमीर (पाळधी) मुनाफ महमूद (जामनेर) शब्बीर रशीद व मुदस्सर अल्ताफ (अडावद), इस्माईल शेख व रियाझ सैयद (नशिराबाद) वसिम निसार (पारोळा) आरिफ हनीफ (चोपडा) यांच्यासह मान्यवरांचा सहभाग होता.

सभेच्या चर्चेत यांनी घेतला सहभाग घेतला. यात प्रामुख्याने रफिक शेख (अडावद) मौलाना फिरोज साकेगाव, मोहम्मद इद्रिस इकबाल जळगाव, डॉ अताउल्ला, हुसेन जनाब अमळनेर, इकबाल वजीर, खलील टेलर,हमिद हवालदार, मुश्ताक हवालदार, यांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेचे,प्रश्नाची समाधान कारक उत्तरे अध्यक्ष फारुक शेख यांनी दिली

सभेचे कामगाज सचिव अजिज शेख, सूत्र संचलन असलम शेख (साकळी), आसिफ शेख,रऊफ शेख ( न्हावी),अब्दुल रज्जाक ( अडावद) व साजिद सईद यांनी केले. सभेची सुरवांत रफिक खान ४० गाव यांचे कुराण पठणाने, तर नात अलिना मुख्तार व अलीना साजिद या मुलींनी सादर केली आभार ताहेर शेख यांनी मानले.

Exit mobile version