Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मणिपूर हिंसाचार प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयात वर्ग

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बहुचर्चीत असलेले मणिपूर राज्यात हिंसाचार प्रकरण समोर आले होते. या २७ प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात येत आहे. याता याची सुनावणी गृवाहाटी उच्च न्यायालया होणार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला देखील खडसावले होते. या प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणातील पिडित महिला या त्यांच्या घरुन ऑनलाइन माध्यमाद्वारे त्यांचा जबाब नोंदवतील अशी विशेष टीप्पणी देखील सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच मणिपूरमध्ये जिथे स्थानिक मॅजिस्ट्रेट आहेत त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा सुरु करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

 

मणिपूरमधील अनेक लोकांनी आसाम किंवा मिझोराम सारख्या राज्यांमध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. कारण येथील अनेक लोकांना दिल्लीत सुनावणीसाठी येणे कठिण होत होते. त्यासाठी मणिपूरच्या लोकांना आसाम किंवा मिझोराममध्ये सुनावणी होणं सोयीस्कर आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची प्रकरणे ही आता  गुवाहाटी उच्च न्यायालयात वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

Exit mobile version