Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगेश चव्हाण यांचा ग्रामीण भागात प्रचार (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 11 at 11.22.51 AM

चाळीसगाव,प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांचा झंझावाती प्रचार दौरा चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सुरू आहे. ग्रामीण जनता अत्यंत उत्स्फूर्तपणे गावागावात त्यांचे फटाके फोडून व औक्षण करून स्वागत करत आहे.

भाजपा उमेदवार मंगेश चव्हाण यांच्याकडे जेष्ठ, पुरुष महिला त्यांना पंढरीचा वारकरी म्हणून तरुण वर्गातून शिवरायांचा निस्सीम भक्त व तालुक्याच्या विकासाचा अभ्यासू उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. अनेक वृद्ध महिला पुरुष मंगेश चव्हाण यांना आपुलकीने जवळ करून आशीर्वाद देतांना परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे असे उदगार काढून शुभेच्छा देतांना दिसून येत आले. मेहुणबारे दहिवद गटात त्यांच्या दौऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Exit mobile version