Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्याचे काम मार्गी लावल्याने आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार

mangesh chavan chalisgaon satkar

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असणार्‍या वाकडी ते मुंदखेडे रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे ग्रामस्थांनी मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाकडी ते मुंदखेडे या रस्त्याचे भाग्य उजळले असून आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्त्याचे वाकडी येथे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ३०५४ लेखाशीर्ष अंतर्गत या २.५ किमी रस्त्यासाठी ४३ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी जि.प. सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समिती उपसभापती संजू पाटील, सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, वाकडीचे सरपंच प्रकाश चौधरी, वाघडूचे सरपंच रविंद्र पाटील, पत्रकार एम.बी.पाटील, अमोल चव्हाण, जितेंद्र वाघ, राजेंद्र बापू पाटील, माजी नगरसेवक निलेश महाराज, गुलाब पाटील, राहुल पाटील, गिरीश बर्‍हाटे विजय पाटील, मनोज गोसावी, पितांबर चौधरी, आबा पोलीस, रमेश अण्णा आदी उपस्थित होते.

Exit mobile version