मंदाताई खडसे यांना न्यायालयाचा दिलासा : दिला ‘हा’ निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भोसरी येथील भुखंड खरेदी प्रकरणाच्या खटल्यात जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाताई एकनाथराव खडसे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्य सौभाग्यवती मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याआधी कोर्टाने तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश दिले होते. तसेच तपास यंत्रणेला या तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही खडसेंनी देण्यात आले. यानंतर काल पुन्हा मुंबई हायकोर्टाने अंतरीम जामीनात वाढ केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी होणार असून तोपर्यंत मंदाताई खडसे यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सौ. खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी ही माहिती दिली असून याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार मंदाताई खडसे या ईडीच्या चौकशीत पूर्णपणे सहकार्य करत असून याआधी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तसेच त्या ज्येष्ठ नागरिक असून त्यांना आरोग्यविषयक अनेक व्याधी जडलेल्या आहेत. दिनांक २७ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या समोर याबाबत सुनावणी झाली असता, मंदाताई खडसे यांचा अंतरीम जामीन २० जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे न्यायमूर्तींनी जाहीर केले. यामुळे त्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण ?

तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करण्यात आली असून एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्यचा आरोप ईडीने केला आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. आजदेखील ते अटकेत आहेत. तर एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यांना या प्रकरणी अंतरीम जामीन मिळाला आहे. तर मंदाकिनी खडसे यांना देखील २० जूनपर्यंत दिलासा मिळालेला आहे.

Protected Content