मारहाणीत तरुणाचा मृत्य

0

पाचोरा प्रतिनिधी। तालुक्यात वरखेडी जवळ भोकरी येथे दोन गटाच्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की भोकरी येथे सकाळी ८.३० दोन गटांत आपसात भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर मारामारीत झाल्यावर त्या मारामारीमध्ये एका तरुणाला मागून दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आदिल अनवर कहाकर वय १५ असे मयताचे नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व उपपोलिस अधीक्षक केशव पातोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी शांतता झाली होती. मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.