Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसोदा रोडवर तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना आसोदा रोड परीसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील तलवार  हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील जुना आसोदा रोड काशीनाथ पाटील नगर जवळ संशयित आरोपी संजय सदाशिव कोळी (वय-४१) रा. जुना आसोदा रोड जवळ हा हातात धारदार तलवार घेवून आरडोओरड करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, पो.हे.कॉ. अनिल देशमुख, कमलाकर बागुल, चालक विजय चौधरी यांनी आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करून संशयित आरोपी संजय कोळी याला अटक केली. त्याच्या ताब्यातील धारदार तलवार हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयिताला शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Exit mobile version