Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे मलकापुरात रेल्वे रोको

मलकापूर प्रतिनिधी । आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्‍वभूमिवर आज सकाळी मलकापूर येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

आज दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठींबा देण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. याला विविध राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. तर आज सकाळपासून ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने आदींसह रास्ता रोको करण्यात येत आहे.

दरम्यान, भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवरमलकापूर रेल्वे स्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चेन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली होती. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी अडवण्यात आलेली ही एक्स्पेस नंतर पुढे सोडण्यात आली. याप्रसंगी रेल्वे पोलिसांनी स्वाभीमानीच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version