Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरावल खुर्द येथे हिवताप जनजागृती मोहीम

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्रांतर्गत येणाऱ्या भालशिव आरोग्य उपकेंद्रच्या माध्यमातुन बोरावल खुर्द येथे  हिवताप विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून आरोग्य कर्मचारी व आशाताई यांच्या हस्ते हस्तपत्रीकांचे वाटप करण्यात आले.

भालशिव आरोग्य उपकेद्रा अंतर्गत यावल तालुका हिवताप निर्मुलन पर्यवेक्षक डाॅ.  नेमाडे यांचा मार्गदर्शनाखाली  आरोग्य सेवक  एस.डी.आहिराव, आरोग्यसेविका, आशाताई यांनी गावातील घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये व महीलांना हिवतापविषयी जनजागृती करत आहेत. त्यामध्ये जलद ताप सर्वेक्षण करणे, पाण्यात गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाइपला जाळी लावणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, पाण्याच्या टाकीवर झाकणे लावावी, खड्ड्यातील पाणी वाहते करणे, कंटनेर सर्वेक्षण पाहणी, सतत हात स्वच्छ पाण्याने धुणे आदींबाबत जनजागृती केली जात आहे.

हात धुण्याच्या पद्धती घरोघरी जाऊन शिकवण्याचे काम आरोग्य शिक्षणाच्या  माध्यमातून आरोग्य विभागातर्फे केले जात आहे.

यावेळी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील प्रत्येकाने आपल्या घरातील डास उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन यावल तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.  हेमंत बऱ्हाटे यांनी केले असुन,  डाॅ. हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.  स्वाती कवडीवाले यांनी केले आहे.

 

Exit mobile version