Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना मिळणार पायाभूत सुविधा ; अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

4Maha 0

 

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्यावतीने धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासन मान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.

सन 2019-20 या वर्षाकरीता अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रतापराव पाटील, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version