Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेजर रॉबर्ट गील यांचा स्मृतिदिनी भुसावळात कार्यक्रम

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील चित्रांची प्रतिकृती साकारणारे प्रसिध्द चित्रकार मेजर रॉबर्ट गील यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशन, भुसावळ’च्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे रुग्णालयासमोरील ख्रिश्चन दफनभूमी येथे मेजर रॉबर्ट गील यांची समाधी असून तेथे त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. याप्रसंगी जिल्ह्यातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार एकत्रित येउन ‘अजिंठा’ या विषयावर आपापल्या शैलीत चित्र साकारुन आदरांजली अर्पण करतील.

तसेच सेंट पॉल चर्चचे आचार्य व सेंट पॉल ख्रिश्चन सेमेस्ट्रीचे अध्यक्ष रेव्हरंट किशोर गायकवाड चर्चचे इतर सभासद हे प्रार्थना करतील यावेळी सहभागी चित्रकारांचा सन्मान करण्यात येईल. सर्व कलावंत व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मेजर रॉबर्ट गील यांना आदरांजली अर्पण करावी. असे आवाहन आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंन्द्र जावळे यांनी केले आहे.

Exit mobile version