Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य विभागात मोठी भरती, थेट मुलाखतीमुळे होणार निवड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागात ही बंपर भरती सुरू आहे. तब्बल 74 पदे भरली जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना आरोग्य विभागाने जाहिर केलीये. मग अजिबातच उशीर न करताना आजच अर्ज करा आणि थेट मिळवा नोकरी. ही पदभरती वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार आहे. यामध्ये एकून पदसंख्या ही 74 आहे.

जिल्हा रुग्णालय अधिनस्त पदसंख्या 12, जिल्हा परिषद अधिनस्त गट अ पदसंख्या 60, जिल्हा परिषद अधिनस्त गट ब पदसंख्या 2 याप्रमाणे 74 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट अत्यंत महत्वाची आहे. पदव्युत्तर, पदविका, एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस असे शिक्षण आवश्यक आहे.

पदानुसार शिक्षणाची अट असणार आहे. या पदभरतीसाठी मुलाखतीचे ठिकाण अहमदनगर आहे. तुम्हाला मुलाखतीसाठी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय हजर राहवे लागणार आहेत. 5 डिसेंबर रोजी या मुलाखती पार पडणार आहे. इच्छुकांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहवे.

विशेष म्हणजे या मुलाखतीमधून थेट प्रकारे निवड केली जाणार आहे. सकाळी 10 वाजता उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. उशीरा आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाहीये. यामुळे वेळेवर पोहचणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर लगेचच मुलाखतीच्या तयारीला लागा.

थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. मुलाखती झाल्यानंतर पुढीला अपडेट तुम्हाला आरोग्य विभागाकडून मिळेल. पदानुसार वेतनश्रेणी देखील ठरलेली आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, मुलाखत ही 5 डिसेंबर  2023 रोजी पार पडणार आहे. आपल्याला अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयात हजर राहवे लागणार आहे.

Exit mobile version