Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी पंतप्रधानांची हत्या : गोळ्या झाडल्याने निधन

टोकिया-वृत्तसंस्ता | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर मारेकर्‍याने गोळ्या झाडल्याने यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाले. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आबे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावरही झाला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास सुरु आहे.

या प्रकारामुळे जपानमध्ये एकच खळबळ उडाली असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली नाही. तर मारेकर्‍याची कसून तपासणी करण्यात येत असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.

Exit mobile version