Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझ्या तालुक्यावर अन्याय होतोय – मा.आ. महेंद्रसिंग पाटील

WhatsApp Image 2019 07 25 at 14.04.12

एरंडोल प्रतिनिधी | येथे नरेंद्र पाटील यांच्या बंगल्यावर नुकतीच आयोजित अनौपचारिक चर्चे प्रसंगी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील बोलत होते की, माझ्या तालुक्यावर ऐवढा अन्याय होत असून याकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष द्या, असे सांगत ते भावूक झाले.

चर्चेत पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या तालुक्यात एकुण ६४ गावे असुन पर्जन्यमानाची 4 गावात बसविलेल्या यंत्रांनी निश्चित केली जाते. तसेच या तालुक्यातील ३६ हजार शेतक-यांचे दुष्काळी भविष्य ठरविले जाते. हे मला मान्य नाही. 4 गावांवरील ६४ गावांचे पर्जन्यमापन ठरविले जाते. मला सरकारी पर्ज्यन्यमानच्या आकडेवारीवर अक्षेप असुन पाऊस पडत असून सध्याच्या हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले आहे. ‘एका बैलाच्या शिंगावर पावसाचे पाणी पडते तर दुस-या बैलाचे शिंग कोरडे असतात’. त्यामुळे पर्जन्य मापन पद्धत ही सुधारित पध्दतीने केली जावी. प्रत्येक गावात स्वतःतलाठी व ग्रामसेवक यांनी थांबुन घ्यावे व त्याची एक समिती गठीत करावी. तालुक्यात एकुण २२ हजार कोटी रुपये अनुदान मिळणार होते, त्याचे काय झाले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच बरोबर पिक विम्याच्या मागणीसाठी मी तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. एरंडोल तथा धरणगाव तालुक्याला संजीवनी देणारा अंजनी प्रकल्पा बद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, प्रकल्प पुर्ण झाला असुन प्रकल्पाची भिंत उंचीचे काम देखील जवळपास 100 टक्के पुर्ण झाले असतांना काही किरकोळ काम वाढीव उंचीचे उरलेले काम रद्द करण्यात आले. अशा आशयाचे पत्र देखील त्यांनी या वेळी दाखविले व लोक प्रतिनिधी पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.

Exit mobile version