Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेलच्या बांधकाम साईटवरुन सव्वा लाखांचे साहित्य लंपास

 

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात असलेल्या जळगाव-औरंगाबाद रोडवरील मैत्रीया चौकात असलेल्या एका हॉटेलच्या बांधकामाच्या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २९ हजार रुपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य चोरून नेण्याचा प्रकार आज उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी जळगाव परिसरातील जळगाव-औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल मैत्रीय चौफुलीवर एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या देखरेखीसाठी योगेश झिपरू शिंदे (वय-५७) रा. रामानंदनगर जळगाव हे देखरेखीसाठी आहे. त्यांच्यासोबत असलेल्या मिस्तरी जावेद शेख मोयुद्दिन रा. दंगल ग्रस्त कॉलनी जळगाव यांनी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता काम आटोपून बांधकामाचे सर्व साहित्य दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममध्ये ठेवून कुलूप लावले होते. दरम्यान मंगळवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मिस्तरी जावेद शेख मोयुद्दिेन बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्यांना बांधकामाचे साहित्याची स्टोअर रूमचा दरवाजता अर्धवट उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचे उघडकीला आले. याठिकाणी बांधकामाचे विविध साहित्य असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी योगेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी व पो.ना. सचिन पाटील करीत आहे.

Exit mobile version