Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेस शिवीगाळ करणाऱ्या संशयितास अटक

Jalgaon news

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रामेश्‍वर कॉलनी मंगलपुरी भागात शुक्रवारी 27 रोजी गल्लीतील महिलांना काहीही एक कारण नसतांना शिवीगाळ करुन धमक्‍या दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

रामेश्‍वर कॉलनीतील मंगलपुरी भागातील रहिवासी अशोक तुकाराम कोळी यांचे लहान बंधु धनराज कोळी यांचे 19 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. परिणामी त्यांच्या घरी दारावर येणाऱ्या नातेवाईक पाहुण्याची बऱ्यापैकी गर्दी आहे. शुक्रवार (ता.27) रोजी त्यांच्या पत्नी इंदुबाई व कुटूंबातील इतर महिला नातेवाईक घराजवळ बसले असतांना गल्लीत राहणारा पवन मुकूंदा सोनवणे सोबत सनी ऊर्फ फौजी बालकिसन जाधव असे कोळी कुटूंबीयांच्या घराजवळ येवुन विनाकारण शिवीगाळ करीत होते. त्यास जाब विचारल्यावर अंगणात बसलेल्या महिलांना अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्ना होईल असे कृत्य करत शिवीगाळ केली व घरात घुसून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात पोलिस नाईक महेंद्रसींग पाटील, मुकेश पाटिल, नितीन पाटील आदिंनी सनी ऊर्फ फौजी बालकिशन जाधव यास ताब्यात घेतले असून मुख्य संशयीत पवन मुकूंदा सोनवणे ऊर्फ घातक हा फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version