Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘जय महेश’च्या घोषणांनी दणाणली जळगाव नगरी (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 06 11 at 8.38.43 PM

जळगाव (प्रतिनिधी) माहेश्वरी समाजातर्फे महेश जयंती मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आली. समाजातर्फे माहेश्वरी चौकातून शोभा यात्रा काढण्यात आली. यात घोड्यावर स्वार लहान मुले, भगवान शिवाच्या वेषात सहभागी तरुणी, अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग यांचा समावेश करण्यात आला होता.

महेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सायंकाळी भगवान महेशची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेचा मार्ग हा माहेश्वरी चौक ते नूतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, फळ गल्ली या मार्गाने माहेश्वरी चौकात सांगता करण्यात आली. जय महेशच्या घोषणांनी शहर दणाणले होते. या शोभा यात्रेत महिलांचं लक्षणीय सहभाग होता. दुचाकीवर स्वार महिला ह्या लक्ष वेधून घेत होत्या. शोभा यात्रा मार्गात ठीक ठिकाणी सरबत वाटप करण्यात येत होते.

Exit mobile version