Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा रावेर तालुकाध्यक्षपदी महेश चौधरी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपा रावेर तालुकाध्यक्षपदी दसनुर येथील महेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी ही नियुक्ती केली आहे.महेश चौधरी यांना मानणारा रावेर तालुक्यात मोठा वर्ग आहे.म्हणून त्यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.यापूर्वी त्यांनी युवामोर्चा तसेच तालुका सरचिटणीस पदावर यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे.संघटनामध्ये काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे.त्यांची पत्नी अनिता चौधरी रावेर पंचायत समितीमध्ये उपसभापती होत्या.त्यावेळी तालुकाभरातुन विविध कामे घेऊन आलेल्या नागरीकांच्या समस्या स्वता: महेश चौधरी सोडवत असत.म्हणून त्यांचा तालुकाभरात संपर्क आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल मंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे,लोकसभा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन,भाजपा महीला जिल्हाध्यक्ष रंजना पाटील,भाजपा जेष्ठ नेते सुरेश धनके,भाजपा जिल्हा चिटणीस श्रीकांत महाजन,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन,आदींनी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष महेश चौधरी यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version