Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती; आकस्मीक घोषणेने धक्का

नवी दिल्ली । टिम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आज आकस्मिकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला असून त्याने आज एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे.

महेंद्रसिंग धोनी हा निवृत्तीच्या विचारात असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. खरं तर आयपीएल ही वेळेवर झाली असती तर यातच त्याने निवृत्ती घेतली असती. तथापि, कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडल्याने त्याने तातडीने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

धोनीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमधील एक पर्व इतिहासजमा होणार असल्याचे मानले जात आहे. विविध मान्यवरांसह सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना धक्का बसला आहे.

Exit mobile version