Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर उपनगराध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर यांची बिनविरोध निवड

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक प्राध्यापक शरद पाटील, आतिश झाल्टे, कैलास नरवाडे, बाबुराव हिवराळे, रिजवान शेख, अनिस शेख, रतन गायकवाड, नगरसेविका लीना पाटील, शितल सोनवणे, ज्योती पाटील, किरण पोळ, सयाबाई सुरवाडे, मंगला माळी यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका यावेळी उपस्थित होते.

जामनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर जागा रिक्त होती. त्या जागेसाठी सोमवार १२ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीबाबत विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी महेंद्र कृपाराम बाविस्कर एकच अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी महेंद्र बाविस्कर यांची जामनेर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर महेंद्र बाविस्कर यांना त्यांच्या उपनगराध्यक्ष निवडीबाबत नगराध्यक्ष साधना महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविकांनी शुभेच्छा दिल्या निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले उपस्थित होते.

जामनेर शहरातील अतिक्रमण धारकाची समस्या मिटवणार उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर जामनेर नगर परिषदेच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षापासून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जामनेर नगरपरिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शहरातील राहिलेले विकास कामे व अतिक्रमणाची समस्या मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून सोडवू, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Exit mobile version