Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे महायुतीतर्फे आ. पाटील यांचा उमदेवारी अर्ज दाखल

WhatsApp Image 2019 10 04 at 3.03.46 PM

पाचोरा प्रतिनिधी |येथील विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. किशोर पाटील यांनी आज (दि. ४) रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी रॅलीत भाजप-सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. किशोर पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असतांना जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील उपस्थित होते. रॅलीपूर्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत एकलव्य सेनेचे अध्यक्ष व म्हाडाचे अध्यक्ष मुळे, भाजपा सरचिटणीस आबासाहेब, पारोळा-एंरोडोल मतदार संघाचे उमेदवार चिमणराव पाटील, आरपीआय तालुकाध्यक्ष, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते. सभेनंतर ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. यावेळी आ. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला.

Exit mobile version