जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आज सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचारास सुरुवात केली.
आ. सुरेश भोळे यांच्या प्रचाराला काल ना. गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. आज आमदार भोळे यांनी अमर चौक, महादेव गल्ली, मिर्झा चौक, नवीन हुडको, संभाजी चौक, हनुमान मंदिर, धनाजी काळे नगर, गेंदालाल मिल, इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर, भारत नगर, साईबाबा मंदिर, राममालती नगर येथे मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण केले. दरम्यान, आ. भोळे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर दुपारी ४ वाजेपासून ममुराबाद नाका, कालींकी माता मंदिर, प्ले सेंटर, प्रशांत चौक, स्वामी नारायण मंदिर, हरिओमनगर, असोदा रोड, उज्ज्वल चौक, घरकुल येथून महर्षी वाल्मिक मंदिर येथे प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मनपा स्थायी सभापती जितेंद्र मराठे,शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे आदींसह मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते बहुसंख्येने रॅलीत सहभागी झाले होते.