खासगीकरणाच्या विरोधात महावितरणचे कर्मचारी जाणार संपावर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वीज पुरवठ्याच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज ०३ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. कर्मचार्‍यांनी आता निर्णायक लढ्याची भूमिका घेतल्याचे यातून दिसून आले आहे. पहिल्या टप्प्यात तीन दिवसांचा संप करण्यात येत असला तरी यात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात महावितरणचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अलीकडेच गौतम अडाणी यांच्या कंपनीने वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. याबाबत बोलणी सुरू असून सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. याच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्याताली ३० संघटना सहभागी होणार आहेत. या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असाल्याची माहिती कर्मचार्‍यांनी दिली आहे.

Protected Content