‘महावीर ट्रेडर्स’चा परवाना कायमस्वरूपी होणार निलंबित ?

बोदवड प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोडवरील महावीर ट्रेडर्सकडून अवैधरित्या खत विक्री व त्यात अनोखी शक्कल लढवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात असून महावीर ट्रेडर्सचा कायमस्वरुपी परवाना निलंबित होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील स्टेशन रोडवरील महावीर ट्रेडर्स कडून अवैधरित्या खत व त्यात अनोखी शक्कल लढवून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची चर्चा असून परवाना निलंबित करण्यात आला असल्याच्या कालावधीत सुद्धा संबंधित दुकानदारांकडून निलंबन काळात सुध्दा खत विक्री व साठवून केली गेली असल्याचे तक्रारदारचे म्हणणे असून जुन्या पावत्या व मागिल वर्षाच्या तारखा टाकून हा प्रकार केला गेल्याचे तक्रारदारांचे म्हणणं आहे.

याबाबत कारवाईची मागणी तक्रारदार गोपिचंद सुरवाडे यांनी तालुका कृषी अधिकारी,बोदवड यांच्याकडे केली आहे.तक्रारदार यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित दुकानदार यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे खुलासा सादर केला.त्यात सबळ पुरावे म्हणून स्वतः: तक्रारदार यांनी यांनी निलंबन काळात खत विकत घेतली असून गोपीचंद सुरवाडे यांनी जो वाहन चालक खत वाहतुकीसाठी नेलं होतं त्याचा चालक सुध्दा खत विक्री झाल्याचे म्हणतं असून संबंधित खत बियाणांची बॅच नंबर,आवक जावक नोंद असणं यात महत्त्वाचे ठरणार असून सबळ पुरावे सादर केल्यास आधि ठराविक कालावधीसाठी परवाना रद्द केला होता तक्रारदार यांनी सबळ पुरावे सादर केल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी श्री.माळी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून पुढील होणा-या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.

जोपर्यंत संबंधित दुकानदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नसून परिणामी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे तक्रारदार यांनी बोलताना सांगितले.त्यामुळे ‘महावीर ट्रेडर्स’चा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Protected Content